सावधान ! Wingo App वापरताय

युजर्सना झटपट कमाई करण्याचे आणि कमी कालावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून विंगो (Wingo)हे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले गेले. या अॅपचा वापर करून युजर्सना झटपट पैसे कमविण्याचे आश्वासन देऊन पैसे गुंतवण्यास सांगितले गेले. या अॅपचा वापर करून युजर्सचा डाटाचा गुप्तपणे गैरवापर केला गेला, तक्रारी आल्यानंतर केंद्राने विंगो अँड्रॉइड अॅपवर कारवाई केली. त्यामध्ये अॅपचे टेलिग्राम चॅनेल आणि यूट्यूब व्हिडिओ ब्लॉक केले.

अशी केली गेली फसवणूक ः
सुरवातीला युजर्सना विंगो अॅप (Wingo) डाउनलोड करण्यास सांगून त्यावर वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितली गेली. युजर्सना गुंतवणूक करण्याच्या नावाखाली पैसे जमा करण्यास सांगितले जात असे. पेमेंटसाठी या अॅपने वैयक्तिक वाॅलेटचा वापर केला गेला. युजर्सच्या अकाउंटवर रक्कम मोठ्या प्रमाणात जमा होऊ लागल्यानंतर अॅप अचानक बंद होत असे, बऱ्याचदा युजर्सना ब्लाॅक करण्याचे प्रकारही होऊ लागले आणि अॅपविरोधात तक्रारी वाढू लागल्या, आणि काहीतरी गडबड असल्याचे युजर्सच्या लक्षात येऊ लागले. हे अॅप युजर्सना आमिष दाखवून आणि त्यांच्या नकळत त्यांच्या फोनवर फसवे एसएमएस मेसेज पाठवून फसवत होते.
सुरक्षित बँकिंग चॅनेलऐवजी, पेमेंट UPI किंवा वैयक्तिक वॉलेटद्वारे केले जात होते, ज्यामुळे युजर्सना त्यांनी केलेले व्यवहार शोधणे कठीण झाले होते. अॅपने काॅन्टॅक्ट, गॅलरी आणि लोकेशन डाटामध्ये प्रवेश देखील मागितला होता, ज्यामुळे वैयक्तिक डेटा चोरीचा गंभीर धोका निर्माण झाला होता. युजर्सना बनावट ग्राहक सेवा क्रमांक देण्यात आले आणि एकदा पैसे गमावले की, सपोर्ट चॅनेल काम करत नसल्याचे आढळून आले. अनेक प्रकरणांमध्ये, तक्रारी वाढू लागल्याने, Wingo अॅपच गुगल प्ले स्टोअरवरून गायब झाले. युजर्सना अधिक कमाई करण्यासाठी अन्य युजर्सना या अॅपशी जोडण्यास सांगितले गेले.


हा सगळा फ्राॅड सुरू असताना तक्रारी थेट केंद्र सरकारकडे गेल्यानंतर भारत सरकारने या मोठ्या सायबर फसवणूक नेटवर्कविरुद्ध कारवाई केली आणि Wingo अॅप तसेच त्याच्याशी संबंधित अनेक टेलिग्राम चॅनेल (Telegram Channel) ब्लॉक केले. ही कारवाई गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरने केली आहे.
तपासात असे आढळले की, हे अॅप केवळ युजर्सचे पैसेच हिरावत नव्हते तर त्यांच्या नकळत फसवे एसएमएस मेसेज पाठवण्यासाठीही त्यांच्या फोनचा वापर करत होते. गृह मंत्रालयाने Wingo अॅपबाबत एक इशारा जारी केला आहे, की Wingo हे युजर्सना झटपट पैसे मिळवण्याचे आश्वासन देऊन जाळ्यात अडकवत आहे. जर तुम्ही तुमच्या फोनवर हे अॅप इन्स्टॉल केले असेल तर ते ताबडतोब अनइंस्टॉल (Uninstall) करा.

Wingo अॅप फसवणूक कशी करत होते?
विंगो अॅप हे युजर्सना झटपट पैसे कमविण्यासाठी छोटी कामे पूर्ण करण्यास सांगत होते. अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर, युजर्सना गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे जमा करण्यास सांगितले जात असे. अ‍ॅपने पेमेंटसाठी वैयक्तिक वॉलेटचा वापर जात असे. अ‍ॅपविरुद्ध तक्रारी वाढू लागल्या किंवा मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होऊ लागल्याने अ‍ॅप अचानक बंद होत असे. वापरकर्ता खाती देखील ब्लॉक केली जात होती. हे फसव्या योजनेसारखे काम करत असे.

हेरगिरीचाही आरोप ः
Wingo अ‍ॅपवर फसवणूक तसेच हेरगिरीचाही आरोप आहे. फोनवर अॅप इन्स्टॉल केल्यानंतर, हे अ‍ॅप लोकांच्या डिव्हाइसवर, जसे की Contacts, Gallary आणि Location यासारख्या फोनवरील अनावश्यक परमिशन मिळवत असे.

अशी केली कारवाई ः
Wingoअ‍ॅपला वैयक्तिक डाटामध्ये प्रवेश मिळाला. हे अ‍ॅप यामाध्यमातून नकळत त्यांच्या फोनवरून इतरांना फसवे एसएमएस मेसेज पाठवत होते. सरकारने Wingo अॅपशी संबंधीत सर्व्हर जिओ-ब्लॉक केला तसेच 50 हून अधिक YouTube व्हिडिओ काढून टाकले आहेत, तसेच 15.3 दशलक्ष फॉलोअर्स असलेले चार टेलिग्राम चॅनेल देखील काढून टाकले आहेत.

सरकारकडून सल्ला:
सरकारने अँड्रॉइड युजर्ससाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कोणतेही फायदे देण्याचे आश्वासन देणारे, आमिष दाखवणारे अ‍ॅप्स डाउनलोड करणे टाळा. शिवाय, तुमच्या फोनच्या गॅलरी किंवा एसएमएसमध्ये प्रवेश मागणारे अ‍ॅप्स तात्काळ काढून टाका. कधीही अज्ञात UPI आयडीवर पैसे पाठवू नका किंवा OTP शेअर करू नका.

सर्व खबरदारी घेतल्यानंतरही तुम्ही फसवणुकीचे बळी ठरलात, तर ताबडतोब १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा किंवा सरकारी पोर्टलवर तक्रार दाखल करा.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *