FASTag मधून कशी फसवणूक होतेय?

प्रवासादरम्यान महामार्गांवरून जात असताना तासनतास् टोलनाक्यावर वाहन थांबवून रांगेतून टोल भरण्याची कटकट फास्टॅग (FASTag) तंत्रज्ञानामुळे मिटली आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुखकर आणि गतीमान झाला आहे. असे असलेतरी फास्टॅग (FASTag) मुळे फसवणुकीचा मार्गही खुला झाला आहे. फास्टॅग (FASTag) फसवणुकीमध्ये सायबर गुन्हेगार डिजिटल टोल सिस्टिमचा गैरफायदा घेऊन हुबेहुब दिसणारी वेबसाइट्स, क्लोन केलेले RFID ( (Radio-Frequency Identification) टॅग्ज, बनावट ग्राहक सेवा क्रमांक आणि अनधिकृत टोल कपात यांसारख्या मार्गांनी वाहनधारकांचे पैसे चोरत आहेत.

फास्टॅग (FASTag) काय आहे ?
फास्टॅग (FASTag) हे ‘रेडिओ फ्रिक्वेंन्सी आयडेंटिफिकेशन’ (Redio Frequency Identification) तंत्रज्ञान आहे. हे स्टिकर स्वरूपात वाहनाच्या विंडशिल्डवर बसवले जाते. यामुळे वाहनधारकांना टोलनाक्यावर रांगेत वाहने उभा करून पैसे भरण्याची गरज नाही, तर हे फास्टॅग वाहनधारकाच्या लिंके केलेल्या प्रीपेड अकाउंटमधून पैसे कापून टोलची रक्कम भरते.
भारतीय महामार्ग व्यवस्थापन मंडळ (IHMCL – Indian Highways Management Company Limited) हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI is the National Highways Authority of India) ही टोलवसूली करते.

अशी केली जाते फसवणूक :
बनावट रिचार्ज आणि वार्षिक पास वेबसाइट्स : यामध्ये फसवणूक करणारे अधिकृत पोर्टल्ससारख्याच दिसणाऱ्या (क्लोन) बनावट वेबसाइट्स तयार करतात आणि अनेकदा सर्च इंजिनवरील जाहिरातींद्वारे त्यांचा प्रचार करतात. यात बळी पडलेले लोक आपल्या वाहनाची आणि पेमेंटची माहिती तिथे भरतात, ज्यामुळे अधिकृत संस्थांऐवजी थेट फसवणूक करणाऱ्यांकडे पैसे जातात.

टॅग क्लोनिंग : साबर गुन्हेगार तुमच्या वाहनाच्या FASTag ची माहिती त्यांच्या स्वतःच्या टॅगवर कॉपी (डुप्लिकेट) करतात. याचा परिणाम असा होतो की, जेव्हा त्यांचे वाहन टोल नाक्यावरून जाते तेव्हा तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात, मग तुमची कार घरीच उभी का असेना.
अनधिकृत QR कोड : फसवणूक करणारे टोल नाक्यांवर बनावट QR कोड्स चिकटवतात. जर तुम्ही स्वयंचलित RFID कपातीऐवजी टोल भरण्यासाठी हे कोड्स स्कॅन केले, तर तुमचे पैसे थेट फसवणूक करणाऱ्याच्या खात्यात जमा होतात.
फिशिंग आणि बनावट ग्राहक सेवा : फसवणूक करणारे हानिकारक लिंक्स असलेले SMS किंवा WhatsApp संदेश पाठवतात, किंवा बँक/NHAI च्या ग्राहक सेवा प्रतिनिधी असल्याचे भासवून तुम्हाला फसवतात. याद्वारे ते तुमच्याकडून OTP किंवा UPI PIN मिळवतात किंवा टॅग ‘Active’ (activate) किंवा ‘रिचार्ज’ करण्याच्या बहाण्याने पैसे ट्रान्सफर करायला लावतात.

बनावट वेबसाईटस्
इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) च्या ‘नॅशनल सायबरक्राइम थ्रेट ॲनालिसिस युनिट’ने (NCTAU) अशा काही ‘फिशिंग’ (phishing) वेबसाइट्स ओळखल्या आहेत, ज्या ‘नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ (NHAI) च्या ‘FASTag Annual Pass’ सेवेचे बनावट रूप धारण करतात. या फसव्या वेबसाइट्सचा ‘गुगल ॲड्स’ (Google Ads) द्वारे सक्रियपणे प्रमोशन केले जाते आणि त्या अधिकाधिक युजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी ‘सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन’ (SEO) तंत्रांचाही वापर करत आहेत. या वेबसाइट्स गुगल सर्चच्या पहिल्या पानावर येतात आणि “fastag annual pass”, “fastag recharge” यांसारख्या ‘कीवर्ड्स’साठी पहिल्या क्रमांकावर (Rank 1) दिसतात; त्यामुळे युजर्सना त्या अधिकृत वेबसाईट वाटतात आणि फसतात.

fastrag

फसवणुकीच्या कार्यपद्धती –

  • फिशिंग वेबसाइट्स अधिकृत NHAI FASTag सेवांचे ब्रँडिंग, लेआउट, लोगो आणि कंटेन्ट अधिकृत असल्याचे भासवून विश्वासार्हतेचा खोटा आभास निर्माण करतात.
  • अद्ययावत SEO तंत्रांचा वापर करून, सायबर गुन्हेगारांनी हे सुनिश्चित केले आहे की फसवी वेबसाइट गूगल सर्च निकालांमध्ये ठळकपणे दिसेल.
  • याशिवाय, व्हिजिबिलीटी (Visibility) तसेच विश्वासार्हता आणखी वाढवण्यासाठी सशुल्क (Paid) गूगल जाहिरातींचा वापर केला जातो.
  • वेबसाइटला भेट देणाऱ्या युजर्संना तथाकथित FASTag वार्षिक पाससाठी पेमेंट करण्यास सांगितले जाते. पेमेंट प्रक्रियेदरम्यान, सोयीस्कर पर्यायासाठी QR कोड दाखवून, पैसे बनावट बँक खात्यांमध्ये वळवले जातात.
  • यात पकडले जाणे टाळण्यासाठी, आर्थिक रिव्ह्यू घेण्यात अडथळा आणण्यासाठी आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कारवाईस विलंब लावण्यासाठी, पेमेंट पेजशी जोडलेली बनावट बँक खाती वेळोवेळी बदलली जातात.

अधिकृत वेबसाईट कोणती –

फास्टॅग (FASTag) साठी कोणतीही एकच मध्यवर्ती अधिकृत वेबसाईट नाही. NHAI/IHMCL च्या अधिकृत 'My FASTag' पोर्टल वरून विविध बँकांचे फास्टॅग वापरता येते. नवीन फास्टॅग खरेदी करण्यासाठी मात्र तुम्हाला अधिकृत बँकांच्या ॲप्स किंवा वेबसाईटचा वापर करावा लागतो.

बनावट वेबसाईटस् कोणत्या आहेत

बनावट FASTag वेबसाईटसची अशी कोणतीही निश्चित यादी मिळणे कठिण आहे, कारण फसवणूक करणारे सतत नवीन डोमेन्स (उदा. fasttag-update.in किंवा myfasttag-recharge.com) तयार करत असतात आणि सर्च इंजिन्सवर वरचे रँकींग मिळवण्यासाठी दिशाभूल करणाऱ्या Google Ads व SEO पद्धतींचा वापर करतात. फक्त FASTag च्या अधिकृत वेबसाईट्शी मिळतेजुळते नाव, डिझाईन तयार करून लोकांना ती खरोखरची आणि अधिकृत FASTag वेबसाईट असल्याचे अथवा त्या वेबसाईटचाच एक भाग असल्याचे भासवतात.

अधिकृत फास्टॅग मिळवण्याचे मार्ग :
बँकांच्या वेबसाईट जसे, ICICI, SBI, HDFC, Axis, किंवा Bank of Maharashtra यांसारख्या अधिकृत बँकांच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येतो.

My FASTag नावाचे अॅप मोबाईलवर फास्टॅग (FASTag) मॅनेजमेंटसाठी IHMCL चे My FASTag ॲप (Google Play Store किंवा App Store) यांचाही वापर करता येतो.

फास्टॅगचा वापर कसा करायचा ?

  • फास्टॅगचा स्टिकर गाडीच्या आतल्या बाजूला, मध्यभागी वरील बाजूस (रिअर-व्ह्यू मिररच्या मागे) चिकटवावे.
  • टोल प्लाझावर पोहोचल्यावर ‘FASTag’ लिहिलेल्या डेडिकेटेड लेनमधून गाडी चालवावी.
  • टोलवरील सेन्सर तुमच्या गाडीवरील फास्टॅग स्कॅन करतात आणि तुमच्या अकाउंटमधून टोलची रक्कम आपोआप कापली जाते.
  • पैसे कट झाल्याचा मेसेज तुमच्या लिंक केलेल्या मोबाईलवर येतो.
  • तुमचे फास्टॅग अकाउंट हे नेहमी पुरेशा रकमेने रिचार्ज केलेले असावे.
  • फास्टॅग हे गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग किंवा संबंधित बँकेच्या ॲपद्वारे वापरता येते.

ही दक्षता घ्यावी –

  • वाहनधारकांनी FASTag वार्षिक पास संबंधित केवळ अधिकृत NHAI वेबसाइट किंवा राजमार्ग यात्रा (Rajmarg Yatra) या अधिकृत ॲपचा (गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध) वापर करावा.
  • या ॲपमध्ये वार्षिक पास खरेदी करणे, पाहणे, नूतनीकरण करणे आणि त्याचा रिव्ह्यू घेण्यासाठी एक स्वतंत्र विभाग आहे.
  • कोणतीही वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती टाकण्यापूर्वी URLs काळजीपूर्वक तपासा.
  • सर्च इंजिनवरील टाॅप रँकिंग किंवा ‘स्पाॅन्सर्ड’ (Sponsored) जाहिराती या अधिकृत असल्याची हमी देत ​​नाहीत. त्यामुळे वाहनधारकांनी अशा साईटवरून पेमेंट करताना सावधगिरी बाळगावी.
  • सर्च रिझल्ट्स, जाहिराती, ईमेल किंवा मेसेजेसद्वारे मिळालेल्या लिंक्स या अधिकृत सरकारी पोर्टल्सच्या असल्याची स्वतंत्रपणे पडताळणी करावी.

फसवणूक झाल्यास हे करा –

Home » FASTag ठरू शकतो फसवणुकीचा ट्रॅक

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *