सध्या डिजिटल अरेस्ट हा फसवणुकीचा नवा प्रकार फोफावला आहे. असंख्य लोकांचे लाखो, करोडो रुपये लुटले गेले आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारकडूनही नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन मोबाईलवर अलर्टद्वारे केले जात आहे. हा डिजिटल अरेस्ट प्रकार काय आहे ? आणि यापासून बचाव कसा करायचा …चला जाणून घेऊयात…
जगभरात नवनवीन सायबर गुन्हे उघडकीस येत आहेत. ओटीपी, क्युआर कोड, डेबिट, क्रेडिट कार्ड याद्वारे फसवणुकीच्या पुढे जात, सध्या मार्केटमध्ये आलाय फसवणुकीचा नवा फंडा, आणि तो म्हणजे `डिजिटल अरेस्ट’. सध्या देशभरात हा फ्रॉड मोठ्या प्रमाणात घडत असून, त्याद्वारे लाखो, करोडो रुपये लुटले जात आहेत.

आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कि कोणताही पोलीस अधिकारी, सीबीआय असो कि कोणतीही शासकीय यंत्रणा, फोनच्या माध्यमातून कधीही कारवाई अथवा अटक करत नाही. त्यामुळे सायबर गुन्हेगारच अशा प्रकारचा फंडा वापरून फसवणूक करत आहेत. डिजिटल अरेस्टमध्ये गुन्हेगारांपर्यंत पोहोचून त्यांना पकडणे पोलिसांनाही खूप जिकरीचे होत असल्यामुळे प्रत्येकाने दक्षता घेणे, हाच मार्ग आहे.
डिजिटल अरेस्ट काय आहे ?
`डिजिटल अरेस्ट’ हा एक असा सायबर फ्रॉड आहे, ज्यामध्ये फ्रॉड करणारा फोन करून स्वतः पोलीस अधिकारी, सीबीआय, सीआयडी, ईडी अधिकारी, कस्टम ऑफिसर बोलत असल्याचे सांगत समोरच्याला तो अथवा त्याचा नातेवाईक आर्थिक तसेच मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज सारख्या गुन्ह्यात अडकल्याचे भासवून त्याला अटक अथवा कायदेशीर कारवाई होणार असल्याचे सांगतो. व्हिडिओ कॉलद्वारे खराखुरा अधिकारी असल्याचे भासवतो. त्यामुळे लोक घाबरून याला बळी पडतात.
ऐकत नसल्यास तसेच त्यातून सुटका करून घेण्यासाठी पैशाची मागणी करतो. त्यामुळे घाबरलेला समोरचा व्यक्ती विचार न करता ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतो. समोरच्याला तो इमोशनली आणि मानसिकदृष्ट्या टॉर्चर करतो.
कशी केली जाते फसवणूक :
या प्रकारात सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक करणारे पोलीस अथवा सीबीआय, सीआयडी अथवा अन्य अधिकारी असल्याचे भासवतात, जेणेकरून समोरचा एकदमच घाबरून जातो. तसेच समोरच्याला त्यांचे आधार कार्ड, सिम कार्ड, डेबिट कार्ड किंवा बँक खाते बेकायदेशीर कृतीसाठी वापरले गेल्याचे सांगितले जाते. व्हिडिओ कॉलद्वारे चौकशी करण्यास संमती न दिल्यास अटक केली जाईल, असे धमकावतात व व्हिडिओ कॉलद्वारे चौकशीस सामोरे जाण्यास सांगतात.
– फोन करणारी व्यक्ती स्वतःच्या फोनवरून कॉल करत नाही, तर व्हॉट्सअप कॉल, इंटरनेट कॉल, बाहेरच्या देशातील नंबरवरून अथवा काही वेबसाईट आहेत, ज्या फेक नंबर जनरेट करून देतात, त्याद्वारे कॉल केला जाऊ शकतो.
– फोन करणारा तुम्ही फोन कट करू नये यासाठी तुमच्यावर दबाव टाकत राहील, आणि तुम्ही फोन कट केलात तरी वेगवेगळ्या माध्यमातून तो फोन अथवा कॉन्टॅक्ट करत राहील.

डिजिटल अरेस्टमध्ये हे भासवले जाते :
पार्सल फसवणूक : तुमच्या नावे बेकायदेशीर वस्तू असलेले पार्सल आल्याचे सांगत गुन्ह्यात गोवण्यात आल्याची माहिती पीडितेला दिली जाते.
कुटुंबातील सदस्यांचा सहभाग : फसवणूक करणारे असा दावा करतात की तुमच्या कुटुंबातील एक सदस्य गुन्ह्यात सामील आहे आणि त्याला त्वरित आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.
आधार किंवा फोन नंबरचा गैरवापर : बेकायदेशीर कामांसाठी तुमचा आधार कार्ड किंवा फोन नंबर वापरल्याचा आरोप पीडितेवर केला जातो.
आकडे काय सांगतात :
– “डिजिटल अरेस्ट” हा सायबर गुन्ह्यांचा एक नवीन प्रकार असून याचे प्रमाण अलीकडच्या काळात खूपच वाढले आहे. एका आकडेवारीवर नजर टाकल्यास २०२४ मध्ये देशभरात ९२ हजार लोक या ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात अडकले आहेत.
– बीबीसीच्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये सायबर गुन्ह्यांशी संबंधी जवळपास ३१ लाख तक्रारी देशभरातून दाखल झाल्या आहेत.
– केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, २०२३ ते २४ या दोन वर्षात देशात लोकांचे १७७ कोटी रुपये सायबर क्राईमच्या माध्यमातून लुटल्याची माहिती देण्यात आली आहे. आणि ही सर्व फसवणूक डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग आणि ऑनलाईन पेमेंटद्वारे केली गेल्याची माहिती देण्यात आली आहे.

डिजिटल अरेस्ट फसवणुकीचे फंडे..
– व्हिडिओ कॉलिंग द्वारे ब्लॅकमेलिंग : यामध्ये व्हिडिओ कॉलद्वारेही फसवणूक केली जाते, अनोळखीकडून कॉल केला जातो, एक दोन वेळा तुम्ही उचलला नाही तरी पुन्हा कॉल येतो. कॉल उचलल्यास निर्वस्त्र झालेली महिला असते, लागलीच ती स्क्रिनशॉट घेते. आणि सुरु होते ब्लँकमेलिंग. संबंधित महिला हे स्क्रीन शॉट शेअर करण्याची धमकी देत पैशाची मागणी करते.
– ई-मेल द्वारे फसवणूक : यामध्ये काही जणांना असे काही ई-मेल येतात कि जे हुबेहूब सरकारी दिसतात, शासकीय स्टॅम्प असलेले असतात. त्यामध्ये सीबीआय अथवा अन्य पोलीस प्रशासनाकडून नोटीस असल्याचे भासवले जाते.
– सहज मिळणाऱ्या कर्जाद्वारे फसवणूक : याशिवाय सहजपणे कर्ज मिळण्याच्या आमिषानेही फसवणूक केली जाते. यामध्ये कर्ज मिळवून दिल्यानंतर ब्लॅकमेलिंग केले जाते. या धसक्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
– एआयचा वापर : आजच्या एआय च्या जगतात, तुमचा चेहरा तसेच आवाज वापरून तुमच्या नातेवाइकांची फसवणूक करू शकतात.
‘डिजिटल अरेस्ट’मध्ये पुढील गोष्टी केल्या जातात :
– अनोळख्या नंबरवरून व्हाट्सअप कॉल केला जातो.
– व्हिडिओ कॉल मध्ये बॅकग्राऊंड पोलीस स्टेशन सारखे तयार केले जाते.
– कॉलद्वारे मुलगा, मुलगी अथवा जवळचा नातेवाईक फ्रॉड मध्ये अडकल्याचे भासवले जाते.
– कॉल कट न करण्यासाठी सातत्याने दबाव टाकला जातो.
– ड्रग्ज, मनी लॉन्ड्रिंग अथवा अन्य अवैध व्यवसायात गुंतल्याचे भासवले जाते.
– फ्रॉडमध्ये अडकलेल्याला अथवा नातेवाईकांना याची कल्पना न देण्याची धमकी दिली जाते.
काय काळजी घ्यावी :
डिजिटल अरेस्ट हा फसवणुकीचा खूप किचकट विषय असला तरी, योग्य दक्षता घेऊन यापासून बचाव करता येतो.
– सर्वात पहिली दक्षता म्हणजे अनोळखी कॉल उचलण्याचे टाळावे. त्यासाठी ट्रू-कॉलर सारख्या अनोळखी कॉल ओळखणाऱ्या अँप फोनवर इंस्टाल करावे.
– पोलीस अधिकारी, सीबीआय, सीआयडी, ईडी अधिकारी, कस्टम ऑफिसर नावाने कॉल आल्यास घाई न करता पूर्ण पडताळणी करावी, संबंधित ऑफिसशी संपर्क साधावा.
– कोणीही फोन करून बँक अधिकारी असल्याचे सांगून बँक अकौंट, क्रेडिट कार्ड, पासवर्ड, आधार कार्ड नंबर मागत असल्यास अशी माहिती देण्याचे टाळावे.

ऑनलाईन तक्रार कोठे नोंदवावी :
डिजिटल अरेस्ट फसवणुकीपासून बचावासाठी Law Enforcement Agency आणि सरकारी संस्था सक्रियपणे काम करत आहेत. त्यांनी सार्वजनिक सूचना जारी केल्या आहेत, फ्रॉड फोन नंबर ब्लॉक केले आहेत आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी प्रकरणांचा तपास करत आहेत. तथापि, या फसवणुकीबाबत जागरूक राहणे आणि सावधगिरी बाळगणे खूप महत्वाचे आहे.
ऑनलाईन अथवा सायबर फसवणुकीची तक्रार https://cybercrime.gov.in/ या केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदवावी. तसेच प्रत्येक राज्यासाठी फोननंबर दिलेले असून त्यावरही तक्रार नोंदवता येऊ शकते. महाराष्ट्रासाठी 022-22160080 हा फोन नंबर आहे.
केंद्र सरकारच्या गृह खात्याने 1930 हा क्रमांक जारी केला आहे. त्यावरही तक्रार नोंदवता येईल.
तुम्हाला अनोळखी कॉल येताहेत..तर सावधान व्हा… !