मोबाईल चोरीला गेला तरी डाटा राहणार सुरक्षित

गुगलने युजर्सच्या सुरक्षिततेसाठी दोन नवीन फिचर्स

वाढते चाललेले सायबर गुन्हे तसेच डेटा चोरी, मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे युजर्सची सुरक्षितता धोक्यात आली आहे. हे प्रकार रोखण्यासाठी मोबाईल, सोशल मिडिया तसेच टेक कंपन्या विविध प्रकारच्या उपाययोजना करून युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. गुगलही सातत्याने नवनवीन उपाय राबवित असते. आता गुगलने युजर्सच्या सुरक्षिततेसाठी दोन नवीन फिचर्स लाँच केले आहेत.
यातील एक फिचर हे अँड्रॉइडमध्ये डेटा चोरी रोखण्यासाठीचे आहे. त्यामध्ये जीमेलमध्ये जेमिनी एआय (Gemini AI) फिचर फोन चोरीला गेल्यास डेटा (Theft data) आणि पैसे वाचवण्यावर लक्ष केंद्रित करते, तर दुसरे फिचर हे जीमेल इनबॉक्सला एआय असिस्टंटमध्ये (AI Assistant) रूपांतरित करण्यावर भर देते.

आता पाहूया, जेमिनी एआय कसे काम करते ते –
आजचे जग डिजीटल झाल्यामुळे सर्व महत्वाची कागदपत्रे, फोटो, माहिती, आयडी, पासवर्ड, बँक तपशील अशा गोष्टी या मोबाईलमध्ये डिजीटल पद्धतीने साठवलेल्या असतात. त्यामुळे मोबाईल चोरीला गेल्यास मोठा धोका संभवू शकतो. कारण मोबाईलच नाहीतर त्यामधील डेटाचा गैरवापर होण्याची शक्यता असते. डेटा चोरी रोखण्यासाठी गुगलने खास फिचर आणले आहे. या फिचरमुळे चोरीला गेलेल्या मोबाईलमधील युजर्सचे बँक अॅप्स, महत्वाची कागदपत्रे, फोटो आणि खासगी डेटा सुरक्षित ठेवला जातो. जेव्हा जेव्हा फोन चोरीला जातो तेव्हा बँक अॅप्स, महत्वाची कागदपत्रे, फोटो आणि खासगी माहिती व डाटा लीक होण्याचा धोका असतो. त्यासाठी गुगलची ही फिचर्स सुरक्षितता प्राप्त करून देतात.

जेमिनी एआय (Gemini AI) आणि अँड्रॉइड (Android) ची सुरक्षा यंत्रणा तुमचा मोबाईल चोरीला गेल्यास डेटा पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी अॅडव्हान्सड सेफ्टी फिचरचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने एआय-जनरेटेड सेफ्टी (AI-powered Theft Detection) आणि गुगल क्लाउड इकोसिस्टम काम करते.

मोबाईल चोरीस गेल्यास जेमिनी आणि गुगल तुमचा डेटा कसा ठेवतात, हे समजून घेऊ-

  • समजा जर कोणी तुमच्या हातातून मोबाईल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल, तर फोनमधील एआयवर आधारित सेन्सर्स ही हालचाल ओळखेल. चोरीची हालचाल ओळखताच जेमिनीशी जोडलेली अँड्रॉइड सिस्टीम फोनची स्क्रीन त्वरित लॉक करते, जेणेकरून चोराला फोन अनलाॅक करता येणार नाही.
  • बऱ्याचदा चोर मोबाईल चोरल्यानंतर इंटरनेट किंवा नेटवर्क बंद करतात. अशावेळी हे फिचर मोबाईल इंटरनेटपासून डिस्कनेक्ट होताच एआय सिस्टीम स्क्रीन लॉक करते, ज्यामुळे डेटा सुरक्षित राहण्यास मदत मिळते.
  • मोबाईल चोरीला गेल्यास तुम्ही दुसऱ्या फोनवरून Google Find My Device वर लॉग-इन करू शकता. याद्वारे तुम्ही घरबसल्या मोबाईलमधील जेमिनी चॅट्स, गुगल अकाउंट आणि संपूर्ण पर्सनल डेटा एका क्लिकवर परमनेन्टली डिलीट (Wipe) करू शकता.
  • जेमिनी ॲपमधील संवेदनशील माहिती किंवा ईमेल्स पाहण्यासाठी फोन अनलॉक असणे आवश्यक आहे. चोरट्याला तुमचा फिंगरप्रिंट किंवा पिन माहीत नसल्यास तो जेमिनी डेटा किंवा वैयक्तिक फाइल्स ॲक्सेस करू शकत नाही.
  • जेमिनी एआयचे संभाषण तसेच डेटा हा तुमच्या फोनमध्ये स्टोअर न होता सुरक्षित गुगल सर्व्हरवर (Cloud) सेव्ह असतो.
    चोरटा मोबाईल अनलॉक करण्यात यशस्वी झाला तरी मुख्य गुगल अकाउंटचे पासवर्ड बदलून तुम्ही डेटा सुरक्षित ठेवू शकता.

दुसरे फिचर जीमेलमध्ये ः
जीमेलचा वापर हा प्रामुख्याने सर्वच ठिकाणी नियमितपणे केला जातो, वैयक्तिक तसेच ऑफिस, शासकीय तसेच व्यवसायासंबंधीची व्यवहार, माहिती याची देवाण-घेवाण केली जाते. या ईमेल डेटाच्या सुरक्षिततेसाठी गुगलने जीमेलमध्ये जेमिनी एआय (Gemini AI) जोडले आहे. हे फिचर ईमेल लिहिण्याची, समजून घेण्याची आणि शोधण्याची पद्धत बदलण्यासाठी सेट केले आहे.
समजा, मोबाईल चोरीला गेल्यास तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही थेट ‘जीमेल इनबॉक्स’ला वैयक्तिक एआय असिस्टंटमध्ये रूपांतरित करू शकत नाही, परंतु गुगलचे एआय टूल्स (Gemini AI आणि Android Theft Protection) चोरीच्या वेळी डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि रिमोटली मॅनेज करण्यासाठी नक्कीच मदत करतात.

जर तुमचा मोबाईल चोरीला गेला, तर गुगलचे एआय (AI) आणि जीमेल सिस्टीम तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील कामे करते:

  • नवीन अँड्रॉइड फोनमध्ये गुगलचे एआय सेंसर (AI Sensors) हे फोन अचानक हातातून ओढला गेल्याची किंवा वेगाने पळून जाण्याची हालचाल (Thrift Detection) ओळखतात. ही संशयास्पद हालचाल दिसताच एआय तुमचा फोन स्क्रीन त्वरित आणि आपोआप लॉक करते, ज्यामुळे चोरट्याला जीमेल किंवा इतर डेटा पाहता येत नाही.
  • मोबाईल चोरीला गेल्यावर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही फोन किंवा कॉम्प्युटरवरून तुमच्या जीमेल अकाऊंटद्वारे डेटा सुरक्षित करू शकता. या लिंकवर जाऊन तुमच्या जीमेल आयडीने लॉगिन करा. येथून तुम्ही चोरीला गेलेल्या फोनमधील सर्व डेटा एका क्लिकवर डिलीट (Erase Data) करू शकता. त्यानंतर Google Account Security पेजवर जाऊन ‘Your Devices’ मधून चोरीला गेलेला फोन तात्काळ ‘Sign Out’ करा. यामुळे चोराला तुमच्या जीमेल इनबॉक्सचा ॲक्सेस मिळणार नाही.
  • चोरट्याने दुसऱ्या डिव्हाइसवरून तुमच्या जीमेलमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न केल्यास, गुगलचे एआय मॉडेल ते ओळखून लॉगिन ब्लॉक करते आणि तुम्हाला अॅलर्ट पाठवते. तुमचा जीमेलमधील डेटा क्लाउडवर एन्क्रिप्टेड असतो, त्यामुळे फोन लॉक असल्यास तो थेट चोरता येत नाही.

या फिचर्सची वैशिष्ट्ये –

  • गुगल बायोमेट्रिक सुरक्षा मजबूत करत आहे. फोन चोरीला गेल्यास, बँकिंग आणि वित्त यासारखे थर्डपार्टी अॅप्स उघडण्यासाठी आता फिंगरप्रिंट/पिन आवश्यक असेल.
  • तुमचा मोबाईल लॉक करण्यासाठी तुम्हाला आता तुमच्या गुगल अकाउंटमध्ये लॉगिन करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही android.com/lock वर तुमचा नंबर टाकून तुमचा फोन लॉक करू शकता.
  • जर कोणी वारंवार चुकीचा पिन टाकण्याचा प्रयत्न केला तर फोन आपोआप लॉक होईल.

ही फिचर्स कशी अॅक्टिव्ह करायची ते पाहू –

  • सर्वप्रथम मोबाईलमधील Settings मध्ये जा
  • Settings मध्ये स्क्रोल करून Google विभागात जा.
  • All Services वर टॅप करा.
  • आता Personalize and Devices safety हा ऑप्शन निवडा.
  • Theft security निवडा.
  • All features ON करा.
(हे ऑप्शन वेगवेगळ्या फोनमध्ये वेगवेगळे असू शकतात)

Gmail मधील AI फिचर्सचे फायदे –

  • यामध्ये Help Me Write आणि Suggested Replies सारखी फिचर्स आता फ्री आहेत. पूर्वी, ही फिचर्स फक्त पेड युजर्ससाठी उपलब्ध होती; आता ती सर्व युजर्ससाठी उपलब्ध झाली आहेत.
  • Gmail एआय मध्ये, तुम्ही आता संपूर्ण क्वेरी टाइप करू शकता. ते ईमेल थ्रेडमधून माहिती काढेल आणि पॉइंट-वाइज सारांश तयार करेल.
  • AI इनबॉक्स तुमचे अलीकडील ईमेल स्कॅन करेल आणि आपोआप महत्त्वाच्या अपडेट्स, करावयाच्या गोष्टी आणि अपॉइंटमेंट्सची यादी तयार करेल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *