तुमचे व्हॉट्सॲप 1 जानेवारीपासून बदलणार

तुमच्या सिमकार्डचा नंबर, आता तोच व्हॉट्सॲपचा नंबर

WhatsApp number

जगभरात व्हॉट्सॲप (WhatsApp) हे संवाद आणि संपर्कात राहण्याचे गरजेचे साधन बनले आहे. जगभरातील लोकांशी यामाध्यमाद्वारे कनेक्ट राहण्याचा हा स्वस्त मार्ग आहे. हे उपयुक्त आणि सुविधेचे साधन असलेतरी सायबर गुन्हेगार बनावट अकाउंटचा वापर करून लोकांची आर्थिक लूट करत आहेत. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी दूरसंचार विभाग (DoT) नवीन वर्षापासून म्हणजेच १ जानेवारी २०२७ पासून देशभरात सिम बाइंडिंगबाबत नियमावली अधिकच कडक करणार आहे. हे टेलिग्रामसाठीही लागू असणार आहे. सध्या आपण सिम कार्डशिवायही आपल्या फोनवर व्हॉट्सॲप तसेच इतर चॅटिंग ॲप्स सहजपणे वापरत आहोत. मात्र, आता ही सुविधा बंद होईल. कारण १ जानेवारीपासून यात बदल केले जाणार आहेत.

येत्या १ जानेवारी २०२७ पासून भारतात व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामसारख्या मेसेजिंग अॅप्ससाठी नवीन ‘सिम बाइंडिंग’ (SIM Binding) नियम लागू केले जाणार आहेत. यानियमानुसार तुमच्या फोनमध्ये ज्या मोबाईल नंबरने व्हॉट्सॲप अकाउंट तयार केले आहे. त्याच नंबरचे सिमकार्ड त्याच फोनमध्ये अॅक्टीव्ह असणे आवश्यक आहे. जर त्या फोममधून तु्म्ही सिमकार्ड काढले तर त्या नंबरचा व्हॉट्सअॅप अॅक्सेस बंद होईल. आणि कार्ड पुन्हा फोनमध्ये घातल्यास पुन्हा व्हॉट्सअॅप अॅक्टीव्ह होईल.

सायबर फसवणूक आणि ‘डिजिटल अरेस्ट’सारखे गुन्हे रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वेगवेगळ्या फोनवर एकाच नंबरचे व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी अडचणीचे ठरणार आहे. वारंवार सिमकार्ड बदलणे आणि प्रवासादरम्यान व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम वापरणाऱ्यांनाही त्रास होऊ शकतो.

WhatsApp number

अनेक युजर्स हे त्यांचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम वाय-फायद्वारे वापरतात. काही युजर्सच्या फोनमध्ये सिमकार्ड वेगळ्या नंबरचे आणि व्हॉट्सअॅप वेगळ्या नंबरचे वापरले जाते म्हणजेच अकाऊंट नोंदणीसाठी वापरलेले सिम कार्ड नसते. त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणजे ज्या नंबरचे सिमकार्ड फोनमध्ये असेल त्याच नंबरचे व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्राम अकाउंट असेल. शिवाय जे युजर्स त्यांच्या टॅब, लॅपटाॅप अथवा डेस्कटाॅपवर वेब व्हॉट्सअॅप वापरतात त्यांनाही पुन्हा क्यूआरकोड स्कॅन करून लाॅगीन करावे लागू शकते. समजा तुमचे मेसेजिंग अॅप मोबाईलवर रजिस्टर झाले नसल्यास अॅपचा अॅक्सेसही बंद होऊ शकतो.

सिम बाइंडिंग म्हणजे काय ?
सिम बाइंडिंग (SIM Binding) म्हणजे मोबाईल ॲप किंवा डिजिटल अकाउंटला तुमच्या स्मार्टफोनमधील प्रत्यक्षातील सिम कार्ड व मोबाईल नंबरशी कायमस्वरूपी किंवा तांत्रिकदृष्ट्या जोडण्याची सुरक्षा यंत्रणा होय.

नियमावली का आणली जात आहे?
व्हॉट्सॲपवर फसवे मेसेज, लिंक्स, एपीके फाईल्स पाठवून फसवणूक करण्यासह डिजिटल अरेस्टचे प्रकार वाढले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी दूरसंचार विभागाकडून कडक नियमावली आणली जात आहे.

WhatsApp number

या मेसेंजरना नियमावली ः
WhatsApp, Telegram, Snapchat, Signal, Josh, JioChat, Arattai, ShareChat

या नवीन नियम कसे असतील –

  • तुमच्या मोबाइल नंबरवर तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट सुरू आहे, तेच सिमकार्ड तुमच्या फोनमध्ये असणे आणि ते सक्रिय (Active) असणे आवश्यक आहे.
  • सिमकार्ड काढल्यास व्हॉट्सअॅप आपोआप बंद होईल. सध्य स्थितीत ओटीपी (OTP) टाकून व्हॉट्सअॅप सुरू केल्यावर फोनमधून सिमकार्ड काढून घेतले तरी फक्त वाय-फायवर (Wi-Fi) व्हॉट्सअॅप चालायचे. मात्र, आता फोनमधून सिमकार्ड काढल्यास, बदलल्यास किंवा नंबर बंद पडल्यास व्हॉट्सअॅप काम करणे बंद करेल.
  • असे असलेतरी तुमच्या जुन्या व्हॉट्सअॅपमधील जुने चॅट्स डिलीट होणार नाहीत तसेच सिमकार्ड पुन्हा घातल्यावर ते अॅप पूर्ववत सुरू होईल.
  • जे युजर्स एका फोनमध्ये सिमकार्ड ठेवून दुसऱ्या फोनवर किंवा फक्त वाय-फायवर व्हॉट्सअॅप वापरतात, त्यांना यापुढे तसे करता येणार नाही
    डेस्कटाॅप, लॅपटॉप किंवा टॅबवर व्हॉट्सअॅप वेब (WhatsApp Web) वापरणाऱ्यांना आता दर ६ तासांनी सेशन आपोआप लॉग-आऊट होऊ शकते. त्यांना पुन्हा QR कोड स्कॅन वापरून व्हॉट्सअॅप सुरू करावे लागणार आहे.
  • हे नियम व्हॉट्सअॅप बरोबरच इतर अॅप्सनाही लागू असणार आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *