मजबूत पासवर्ड वापरा: नेहमी मजबूत आणि किचकट पण स्वतःच्या लक्षात राहील असा पासवर्ड वापरावा. तसेच तो पासवर्ड नियमितपणे बदलत राहावा आणि असा पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नका.
वन टाईम पासवर्ड (OTP) वापरा : ही सुरक्षिततेची एक अतिरिक्त स्टेप आहे. पासवर्डसह आणखी एक ऑथेंटिकेशन मेथड आहे, हा एक असा कोड असतो कि जो मोबाईलवर एसएमएस द्वारे सहा अंकी कोड मिळतो.
अँटीव्हायरस आणि अँटीमालवेअर सॉफ्टवेअर: कॉम्पुटर, लॅपटॉप तसेच मोबाईल डिव्हाइसवर अँटीव्हायरस आणि अँटीमालवेअर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे आणि ते नियमितपणे अपडेट करावे. त्यामुळे इंटरनेट तसेच विविध साईट्सवरून शिरकाव करणारे व्हायरस रोखता येतात.
सॉफ्टवेअर अपडेट्स: आपले ऑपरेटिंग सिस्टीम, ब्राउझर आणि इतर सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवा जेणेकरून ते नवनवीन सुरक्षा उपायांनी सिस्टीम सुसज्ज राहिल.
सार्वजनिक वाय-फाय सुरक्षित वापरा : सार्वजनिक वाय-फाय वापरताना काळजी घ्यावी. महत्त्वाची माहिती सार्वजनिक वाय-फायवर शेअर करणे टाळावे.
फिशिंगपासून संरक्षण : अनोळखी ईमेल, लिंक किंवा अटॅचमेंटवर क्लिक करणे टाळावे. नेहमी रिलायबल सोर्सेसकडूनच माहिती मिळवावी.
डेटा एन्क्रिप्शन : संवेदनशील डेटा एन्क्रिप्ट करा, त्यामुळे डेटा चोरीला गेला तरी तो वाचता येणार नाही.