आक्षेपार्ह, अश्लिल, दिशाभूल करणारा कंटेन्ट सापडल्यास होणार कारवाई

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह, दिशाभूल करणारा आणि फसवणूक करणारा कंटेन्ट रोखण्यासाठी सोशल मीडियातील सर्वांत मोठी कंपनी मेटाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर अधिक व्यापकपणे करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तुमच्या फेसबुक, इन्स्टाग्राम अकाउंटवर आक्षेपार्ह पोस्ट, फोटो, व्हिडिओ, रिल्स अथवा काॅमेंट्स असतील तर तुमचे अकाऊंट ब्लाॅक केले जाऊ शकते. त्यामुळे सावध व्हा. कारण अशा पोस्टवर आता एआयची नजर आहे.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर दररोज कोट्यवधी पोस्ट, फोटो, व्हिडिओ आणि कमेंट्स शेअर केल्या जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणातील कंटेन्टवर मानवी पातळीवर सतत नजर ठेवणे कठीण असल्याने मेटाने एआय-आधारित यंत्रणेला अधिक महत्त्व दिले आहे.
फास्टटॅग वापरताय..मग हे अवश्य वाचाhttps://cybersafetys.com/fasttagfraud/: सावधान ! तुमच्या फेसबुक-इन्स्टाग्राम अकाउंटवर आहे ‘एआय’ची नजर
मेटाच्या म्हणण्यानुसार, नवीन एआय टूल दररोज ५ हजारांहून अधिक फसवणुकीचे प्रकार शोधून काढत आहे. यातील अनेक प्रकार पूर्वीच्या कंटेन्ट रिव्ह्यू यंत्रणेला सहजपणे ओळखता येत नव्हते. एआय मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या पोस्टचे विश्लेषण करून संशयास्पद पॅटर्न, बनावट अकाउंट, फसवणुकीचे प्रयत्न आणि कम्युनिटी गाईडलाइनचे उल्लंघन करणारा कंटेन्ट शोधण्यास मदत करते.
एआयच्या वापरामुळे आक्षेपार्ह तसेच चुकीच्या कंटेन्टमध्ये ६० टक्क्यांहून अधिक घट झाल्याचा मेटाचा दावा आहे. तसेच सेलिब्रिटींच्या नावाने तयार केलेल्या बनावट फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंट्सबाबतच्या तक्रारींमध्ये ८० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

जर एआयने चुकून एखादी पोस्ट किंवा युजरचे अकाउंट ब्लाॅक केले, तर युजर्सना अपील करण्याचा पर्याय असेल. अकाउंट बॅनसारख्या गंभीर प्रकरणांमध्ये, मनुष्यांकडून पुन्हा रिव्ह्यू घेतला जाणार आहे. त्यामुळे मेटा कंपनीने त्यांची रणनीती ही मनुष्यबळ कमी करण्याची नसल्याचे स्पष्ट केले आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम कम्युनिटी गाईडलाईन तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या पोस्ट ओळखण्यासाठी मेटाने एआयवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे, कारण फेसबुक, इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट्स, पोस्ट, फोटो, व्हिडिओ, रिल्सची प्रकरणे वाढत आहेत, त्यावर तत्काळ नियंत्रण ठेवणे आवाक्याबाहेरचे असल्याने कंपनीने एआयचा आधार घेण्यास सुरवात केली आहे. असे असले तरी अधिक गंभीर प्रकरणांमध्ये मनुष्यबळाचा वापर पुर्वीप्रमाणेच केला जाणार आहे.
थोडक्यात, सामान्य आणि मोठ्या प्रमाणातील उल्लंघने एआय शोधेल, तर गुंतागुंतीची आणि गंभीर प्रकरणे मनुष्य तपासेल. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कंटेन्ट नियंत्रण अधिक वेगवान करण्यासोबतच चुकीच्या कारवाईला आळा घालण्याचा प्रयत्न मेटाकडून केला जात आहे.
एआय या पोस्टवर करणार कारवाई –
फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील पोस्टचे रिव्ह्यू करताना मेटाची एआय सिस्टिम घोटाळे, अमली पदार्थ, लैंगिक शोषण, अश्लिल कंटेन्ट, फोटो, व्हिडिओ आणि इतर गंभीर गोष्टी ओळखेल आणि त्यावर कारवाई करेल. पोस्ट व्यतिरिक्त, एआय सोशल मीडिया एकाउंटचाही रिव्ह्यू केला जाणार असू त्यामध्ये बदनामी करणाऱ्या, भावना दुखावणाऱ्या पोस्ट तसेच कम्युनिटी गाई़डलाईनचे उल्लंघन करणाऱ्या पोस्ट शोधल्या जाणार आहेत, एआयच्या वापरामुळे मानवी हस्तक्षेपाची गरज कमी होणार आहे.
मेटाने हेही स्पष्ट केले आहे की, कंटेन्ट रिव्ह्यू करण्यासाठी त्यांची यंत्रणा पु्र्णपूणे एआयवर अवलंबून राहणार नाही. तर या सिस्टिममध्ये कर्मचाऱ्यांचा सहभाग कायम राहणार आहे.
https://cybersafetys.com/bengalurutopincybercrime/: सावधान ! तुमच्या फेसबुक-इन्स्टाग्राम अकाउंटवर आहे ‘एआय’ची नजर

मेटा एआयचा वापर का करत आहे?
मेटा कंपनीला थर्डपार्टी मनुष्य नियंत्रकांवर अवलंबून राहणे कमी करायचे आहे. शिवाय, अनेक पोस्ट मानवी रिव्ह्यूमधूनही सहज सुटतात, असे लक्षात आले आहे. त्यामुळे, उल्लंघन करणारा कंटेन्ट तपासण्यासाठी ते एआय टूल्सचा वापर केला जात आहे. एआय सिस्टिम ही साधा उल्लंघन करणारा कंटेन्टही अचूकपणे व सहजपणे शोधते.
कोणती कारवाई होणार?
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर कम्युनिटी गाईडलाइनचे उल्लंघन करणाऱ्या पोस्ट, अकाउंट आणि फसवणुकीचे प्रकार शोधण्यासाठी मेटाकडून एआयचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. एआय संशयास्पद कंटेन्ट किंवा बनावट अकाउंट ओळखल्यानंतर त्यावर तातडीने कारवाई करण्यास मदत करेल. गंभीर उल्लंघन करणाऱ्या पोस्ट हटवल्या जाऊ शकतात, तर संबंधित अकाउंटवर निर्बंध किंवा बंदी घातली जाऊ शकते.
फसवणूक, बनावट अकाउंट आणि इतर हानिकारक कंटेन्टचे नेटवर्क शोधून त्यावरही कारवाई केली जाणार आहे. विशेषतः सेलिब्रिटींच्या नावाने तयार केलेल्या बनावट अकाउंट्सवर लक्ष केंद्रित केले जाईल.
मात्र, एआयचा निर्णय अंतिम असणार नाही. एआयने चुकीने एखादी पोस्ट हटवली किंवा अकाउंट ब्लॉक केले, तर युजरला अपील करण्याची संधी मिळेल. अकाउंट बॅनसारख्या गंभीर प्रकरणांमध्ये मानवी रिव्ह्यू केला जाईल. त्यामुळे एआयच्या वेगासोबत मानवी निर्णयक्षमताही कायम ठेवण्याची मेटाची भूमिका आहे.
https://cybersafetys.com/mobiletheftdata/: सावधान ! तुमच्या फेसबुक-इन्स्टाग्राम अकाउंटवर आहे ‘एआय’ची नजर