जगभरात सर्वाधिक सायबर क्राईम रशियात; भारत १० व्या क्रमांकावर

तज्ज्ञांनी ‘वर्ल्ड सायबर क्राइम इंडेक्स’ (World Cyber Crime Index) जाहीर केला आहे. 100 देशांचा त्यात समावेश होता. जगात सर्वाधिक सायबर गुन्हे हे रशियात, तर युक्रेन दुसऱ्या आणि चीन तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिका चौथ्या स्थानावर आहे. अहवालात, रॅन्समवेअर, क्रेडिट कार्ड चोरी आणि फसवणूक यासह सायबर गुन्ह्यांच्या विविध कॅटेगरी पाहायला मिळाल्या आहेत.

topcountry

सायबर गुन्ह्यांवर आधारित गुण दिले जातात
तज्ज्ञांनी ‘वर्ल्ड सायबर क्राइम इंडेक्स’मध्ये सायबर गुन्ह्यांच्या आधारे गुण दिले आहेत. मात्र, प्रकरणांची संख्या सांगितली नाही. रशियाचा जागतिक सायबर क्राइम इंडेक्स स्कोअर (WCI स्कोअर) हा १०० पैकी ५८.३९, युक्रेनचा ३६.४४ आणि चीनचा २७.८६ होता. भारताचा WCI स्कोअर 6.13 होता.

जागतिक सर्वेक्षण केले गेले :
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील तज्ज्ञांनी सायबर गुन्ह्याचा जागतिक अभ्यास केला. या आधारे इंडेक्स तयार करण्यात आला. हा सर्व्हे पाच मुख्य सायबर गुन्ह्यांवर केंद्रित होता. या तज्ञांनी प्रत्येक सायबर क्राइम श्रेणीचा प्राथमिक सोर्स मानलेले देश ओळखले. याशिवाय, त्यांनी सायबर क्राईम ॲक्टिव्हिटीच्या प्रभावावर आधारित प्रत्येक देशाची क्रमवारी ठरवली.

सर्वाधिक सायबर क्राईम असलेले टॉप टेन देश असे :
१. रशिया
२. युक्रेन
३. चीन
४. अमेरिका
५. नायजेरिया
६. रोमानिया
७. नॉर्थ कोरिया
८. ब्रिटन
९. ब्राझील
१०. भारत

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *