अलीकडच्या काळात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत आहेत, एखादी चूक मोठे आर्थिक नुकसान करू शकते. त्यासाठी तात्काळ उपाययोजना करून नुकसान टाळण्याचा प्रयत्न करणे आवश्यक ठरते.

भारत सरकारने नागरिकांवर होणाऱ्या साइबर गुन्ह्यांची तक्रार ऑनलाइन स्वीकारण्यासाठी ‘राष्ट्रीय साइबर अपराध रिपोर्टिंग पोर्टल’ (https://cybercrime.gov.in/) सुरु केले आहे. इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा साइबर क्राइम घडल्यास घरबसल्या तक्रार करू शकता. हे पोर्टल गृह मंत्रालय (Ministry of Home Affairs or Master of Health Administration) भारत सरकार चालवते.
विशेष पोर्टल सुरु केले आहे, कि जेथे नागरिकांना तक्रार नोंदवता येते. हे एक ऑनलाइन तसेच ऑफलाइन रिपोर्टिंग पोर्टल आहे, कि जे ११ डिसेंबर २०२३ रोजी सुरु करण्यात आले. या पोर्टलवर जाऊन नागरिकांना फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवता येते. याशिवाय ‘१९३०’ हा टोल फ्री नंबरही या पोर्टलला सपोर्ट करतो.
या पोर्टलवर हॅकिंग, ओळख चोरी, ऑनलाइन फसवणूक तसेच सायबर गुन्हेगारी यासारख्या गुन्ह्यांबाबत तक्रार दाखल करता येते. तक्रार नोंदवत असताना संबंधित पुरावे देखील फाईल स्वरूपात अपलोड करता येतात तसेच त्या तक्रारीच्या तपासाचा फॉलोअप देखील पाहता येतो.
हे पोर्टल नागरिकांना सायबर घटना रोखण्यास मदत करण्यासाठी ‘सायबर सुरक्षा टिप्स’ आणि जनजागृती तत्त्वांसह रिसोर्स देखील दर्शविते.

या पोर्टलवर कोणत्या प्रकारच्या तक्रारी करता येतात?
1) स्त्रियांवरील व मुलांवरील साइबर गुन्हे
- सोशल मीडियावर छेडछाड
- मॉर्फिंग, फेक फोटो/व्हिडिओ
- अश्लील संदेश
- ऑनलाईन ब्लॅकमेलिंग
2) आर्थिक/फायनान्सीयल साइबर गुन्हे
- UPI फ्रॉड
- ATM/डेबिट कार्ड फ्रॉड
- बँकिंग फ्रॉड
- ऑनलाइन खरेदी फ्रॉड
- क्रिप्टो फ्रॉड
- KYC अपडेटच्या नावाखाली फसवणूक
3) इतर साइबर गुन्हे
- हॅकिंग
- डेटा चोरी
- सोशल मीडिया खाते हॅक
- फेक प्रोफाइल
- ओटीपी फ्रॉड
- कामाची ऑफर देऊन फसवणूक
आता पाहूया, यावर तक्रार कशी नोंदवायची ते…
1) वेबसाइट ओपन करा:
2) प्रकार निवडा
- Report Women/Child Related Crime
किंवा - Report Other Cyber Crimes
3) नोंदणी (Registration)
तुमचा मोबाईल नंबर OTP ने व्हेरिफाय करावा लागतो.
4) तक्रारीची माहिती भरा
- घटना कधी घडली
- गुन्हेगाराचा नंबर/ID
- स्क्रीनशॉट
- पैसे किती गेले
- लिंक, चॅट्स, व्हिडिओ पुरावे
5) सबमिट करा
तक्रार जिल्हा सायबर सेल किंवा SP कार्यालयात पोहोचते.

तक्रार केल्यानंतर काय होते?
- तुम्हाला तक्रार क्रमांक (Acknowledgement Number) मिळतो.
- स्थानिक पोलिस किंवा साइबर पोलीस विभाग तुमच्याशी संपर्क करतात.
- आर्थिक फसवणुकीसाठी तक्रार केल्यास बँक खात्यांवर hold लावण्याची प्रक्रिया सुरू होते.
तक्रारीसाठी आवश्यक पुरावे
पुरावे जितके स्पष्ट तितकी कारवाई जलद.
- स्क्रीनशॉट
- व्हिडिओ/ऑडिओ
- व्यवहाराचे स्टेटमेंट
- UPI ID / मोबाईल नंबर
- फेक लिंक
- चॅट हिस्टरी
- गुन्हेगाराची माहिती
या पोर्टलची उद्दिष्ट्ये :
- वाढत्या साइबर गुन्ह्यांवर नियंत्रण
- तक्रार प्रक्रिया सोपी, जलद आणि डिजिटल
- महिला व मुलांना संरक्षण
- आर्थिक फसवणूक रोखणे
- देशभरातील साइबर पोलीस यंत्रणा जोडणे
लक्षात ठेवा
- यावर तक्रार करणे पूर्णपणे मोफत
- तुमची माहिती गोपनीय ठेवली जाते
- आपत्कालीन परिस्थितीत 24×7 हेल्पलाइन 1930 वर कॉल करा