तुमच्या व्हॉट्सअपवर ‘मेटा एआय’ (Meta AI) फिचर दिसत असेल, तुम्ही त्याचा वापर करत नसाल. तर आता तो खुबीने वापर कराल…कारण हे एक अतिशय उपयुक्त फिचर आहे…चला तर जाणून घेऊयात… या ‘मेटा एआय’ (Meta AI) फिचर विषयी…

मेटा कंपनीने त्याचा AI (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) असिस्टंट म्हणजेच ‘Meta AI’ लाँच करून भारतात खळबळ उडवून दिली आहे. आता ते WhatsApp सह सर्व मेटा प्लॅटफॉर्मवर म्हणजे इंस्टाग्राम, मेसेंजरवर उपलब्ध झाले आहे. त्याच्या मदतीने, तुम्ही अगदी रेसिपी बनवण्यापासून ते AI-Image तयार करण्यापर्यंत अनेक गोष्टी काही मिनिटांत करू शकता. थोडक्यात, ‘मेटा एआय’मुळे व्हॉट्सॲपला ‘वन-स्टॉप’ असिस्टंट मिळाला आहे.
चला सविस्तर माहिती करून घेऊयात…
‘Meta AI’ हा कंपनीचा AI असिस्टंट टूल आहे, कि जो, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि मेसेंजरवर हे उपलब्ध असून त्याच्या मदतीने, यूजर्सना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे क्षणार्धात मिळू शकतात. इतकंच नाही तर व्हॉट्सॲप चॅटिंगदरम्यान कोणतीही इमेज/फोटो किंवा जीआयएफ (GIF) फाईल जनरेट करायची असेल तर ‘व्हॉट्सॲप एआय चॅट बॉक्स’मध्ये टाईप करावं लागेल की तुम्हाला कोणत्या प्रकारची इमेज/फोटो हवा आहे, ती इमेज एआयमध्ये दिसेल. ते चॅट तुम्ही कोणालाही शेअर करू शकता.
आता जाणून घेऊया, ‘मेटा एआय’ म्हणजे नक्की काय?
Meta AI हे व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, मेसेंजरमध्ये तुमचे ‘व्हर्च्युअल असिस्टंट’ म्हणून काम करते. हे तुम्हाला तुमची अनेक कामे करण्यास मदत करते. त्याच्या मदतीने तुम्ही अनेक क्रिएटिव्ह कामे सहजपणे करू शकता. शिवाय, ते तुम्हाला कोणतीही इमेज/फोटो तयार करायचा असेल किंवा एखादी रेसिपी तयार करण्यास तसेच कोणतीही माहिती हवी असल्यास फक्त चॅटमध्ये टाईप करून ती मिळवू शकता तसेच मित्रांना तसेच व्हॉट्सअप ग्रुप्सवर तात्काळ शेअर करू शकता.
व्हॉट्सॲप ग्रुप चॅटमध्ये ते रेस्टॉरंट सुचवणे, Facebook वर ट्रिपचे नियोजन करणे किंवा Instagram वर फोटो एडिटिंग करणे यापासून आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टी या फिचरच्या साहाय्याने करणे शक्य आहे.
ही एक पर्यायी सर्व्हिस असून ज्या यूजर्सना याचा वापर करायचा आहे, त्यांना सेटिंग्जमध्ये ते मॅन्युअली निवडावे लागेल आणि आवश्यक सेटअप फोटो कॅप्चर करावा लागेल.
‘मेटा एआय’सह व्हॉट्सॲप यूजर्सच्या अनुभवाच्या सीमा पार करत आहे. AI परस्परसंवाद पर्सनलाईज करण्याची तसेच कस्टमाइज अवतार तयार करण्याची क्षमता ‘व्हॉट्सॲप इकोसिस्टम’मध्ये आणू शकते.

आता पाहूया, ‘मेटा एआय’ची उपयुक्तता काय आहे ते…
तुम्ही ‘Meta AI’ ला कोणताही प्रश्न विचारू शकता. याशिवाय मजकूर तयार करणे, कोणत्याही मजकुराचे भाषांतर करणे, मजकुराचा सारांश देणे, कस्टमाइजपणे उत्तरे देणे आणि कोणत्याही गोष्टीसाठी सूचना देणे यासाठी त्याचा वापर करता येतो.
याशिवाय, एआयच्या मदतीने तुम्ही चॅट किंवा संवाद साधू शकता, इमेज तयार करू शकता, व्याख्या लिहू शकता आणि गेम खेळू शकता.
‘अवतार’ कसे काम करते…
यासाठी, यूजर्स ‘मेटा एआय’ चॅटमध्ये ‘Imagine me’ टाइप करून अवतार निर्मिती प्रक्रिया सुरू करू शकतात. याव्यतिरिक्त इतर चॅटमध्ये ‘@Meta AI Imagine Me’ वापरू शकतात.
यूजर्सना सेटअप फोटोंचा सेट कॅप्चर करावा लागेल, ज्याचे विश्लेषण मेटा एआयद्वारे केले जाईल.
वापरकर्त्यांचे या वैशिष्ट्यावर पूर्ण नियंत्रण आहे. मेटा एआय सेटिंग्जद्वारे सेटअप फोटो कधीही काढला जाऊ शकतो. जेनरेट केलेली अवतार इमेज चॅटमध्ये आपोआप शेअर केली जाईल, एक मजेदार आणि पर्सनलाझज टच जोडून.