सोशल मीडिया, ऑनलाइन पेमेंट, ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन शॉपिंगमुळे आपली कामे सोपी झाली आहेत. मात्र दुसरीकडे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचेही कटू सत्य आहे. ही एक मोठी समस्या बनली आहे.
या समस्या लक्षात घेऊन यूजीसीने सायबर सिक्युरिटी आणि डेटा प्रोटेक्शन हा कोर्स सुरू केला आहे. या कोर्सचा उद्देश जागरूक, प्रतिसाद देणारा आणि जबाबदार डिजिटल नागरिक तयार करणे हा आहे.
UG म्हणजेच अंडरग्रेजुएट विद्यार्थी मूलभूत आणि मध्यम स्तरावरील संकल्पनांचा अभ्यास करतील तर PG म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना अपडेटेड संकल्पनांचा परिचय करून दिला जाणार आहे.
UG कोर्समध्ये सायबर सिक्युरिटी, सायबर क्राइम, सायबर लॉ, सोशल मीडिया, ई-कॉमर्स, डिजिटल पेमेंट्स आणि डिजिटल उपकरणांची सुरक्षा यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे.
तर PG अभ्यासक्रमांमध्ये सायबर गुन्हे, सायबर कायदा, डेटा गोपनीयता आणि सुरक्षा, सायबर सुरक्षा व्यवस्थापन, सायबर सुरक्षा कम्प्लायन्स आणि सायबर गव्हर्नन्स यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश होतो. सायबर जागरूकता आणि सायबर साक्षरता तसेच या क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

आता जाणून घेऊयात…या कोर्सचे महत्त्व
– विद्यार्थ्यांना कॉम्पुटर आणि मोबाईलशी संबंधित मूलभूत सायबर सुरक्षा बाबी समजून घेता येतील.
– विद्यार्थी वैयक्तिक स्तरावर डेटा गोपनीयतेच्या बारकावे जाणून घेण्यास सक्षम असतील.
– विद्यार्थ्यांना भारतात अस्तित्वात असलेल्या विविध सायबर गुन्ह्यांसाठी कायदे आणि कायदेशीर चौकट समजेल.
– सोशल मीडिया सोशल मीडिया, ऑनलाइन पेमेंट, ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन शॉपिंगमुळे आपली कामे सोपी झाली आहेत. मात्र दुसरीकडे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचेही कटू सत्य आहे. ही एक मोठी समस्या बनली आहे. या समस्या लक्षात घेऊन यूजीसीने सायबर सिक्युरिटी आणि डेटा प्रोटेक्शन हा कोर्स सुरू केला आहे. या कोर्सचा उद्देश जागरूक, प्रतिसाद देणारा आणि जबाबदार डिजिटल नागरिक तयार करणे हा आहे.
UG म्हणजेच अंडरग्रेजुएट विद्यार्थी मूलभूत आणि मध्यम स्तरावरील संकल्पनांचा अभ्यास करतील तर PG म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना अपडेटेड संकल्पनांचा परिचय करून दिला जाणार आहे. UG कोर्समध्ये सायबर सिक्युरिटी, सायबर क्राइम, सायबर लॉ, सोशल मीडिया, ई-कॉमर्स, डिजिटल पेमेंट्स आणि डिजिटल उपकरणांची सुरक्षा यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे.
तर PG अभ्यासक्रमांमध्ये सायबर गुन्हे, सायबर कायदा, डेटा गोपनीयता आणि सुरक्षा, सायबर सुरक्षा व्यवस्थापन, सायबर सुरक्षा कम्प्लायन्स आणि सायबर गव्हर्नन्स यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश होतो. सायबर जागरूकता आणि सायबर साक्षरता तसेच या क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

आता जाणून घेऊयात…या कोर्सचे महत्त्व
– विद्यार्थ्यांना कॉम्पुटर आणि मोबाईलशी संबंधित मूलभूत सायबर सुरक्षा बाबी समजून घेता येतील.
– विद्यार्थी वैयक्तिक स्तरावर डेटा गोपनीयतेच्या बारकावे जाणून घेण्यास सक्षम असतील.
– विद्यार्थ्यांना भारतात अस्तित्वात असलेल्या विविध सायबर गुन्ह्यांसाठी कायदे आणि कायदेशीर चौकट समजेल.
– सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होणारे गुन्हे टाळण्यास मदत होईल.
– विद्यार्थ्यांना पासवर्ड, सेटिंग्ज आणि विविध प्रकारची सोशल मीडिया अकाउंट्स, कॉम्पुटर, टॅब आणि मोबाइलशी संबंधित विविध धोरणे जाणून घेता येतील.
– भारतात सायबर साक्षरतेला चालना दिली जाईल. युवक जागरूक होतील.
– सायबर सुरक्षा क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढतील. येत्या काही दिवसांत विद्यापीठात नवीन सायबर सुरक्षा विभाग सुरू होणार आहेत. येथे संशोधनाचे काम सुरू होईल.
थोडक्यात, या अभ्यासक्रमामुळे समाजातील जागरूक नागरिकांची संख्या तर वाढेलच शिवाय गुन्हेगारीमुक्त भारत घडवण्यातही मदत होईल. या अभ्यासक्रमामुळे रोजगाराच्या नवीन संधीही मिळतील अशी अपेक्षा आहे. पुढील वर्षी सुरू होणाऱ्या डिजिटल विद्यापीठापूर्वी अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करणे म्हणजे मोठ्या कार्यापूर्वी पाया मजबूत करण्यासारखे आहे.