देशात सध्या 134 कोटींहून अधिक आधार कार्डधारक आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने कार्ड असल्याने त्यातील अपडेट होणारी माहिती अगर सुचनांचे रेकॉर्ड ठेवणे सरकारपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू एकाच ठिकाणी नोंदवला गेला असेल, तर आधार कार्डवरील पत्ता इतरत्र असे प्रकार उघडकीस आले, यासह अनेक तांत्रिक अडचणीही दिसून आल्या असून असंख्य मृत व्यक्तींची आधारकार्डे आजही अॅक्टीव्ह दिसत आहेत. अशा अडचणी दूर करण्यासाठी व अधिकारी डाटा सुलभ करण्यासाठी (UIDAI – Unique Identification Authority of India ) ने पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आहे. वेगवेगळ्या विभागांमधील समन्वय वाढवून ही प्रोसेस आणखी वेगवान करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून UIDAI ने मृत व्यक्तींचे एक कोटी १७ लाख आधार क्रमांक निष्क्रिय केले आहेत, की जे राष्ट्रीय ओळख डेटाबेसमधील सर्वांत मोठ्या कामापैकी एक आहे.
UIDAI ने भारताचे रजिस्ट्रार जनरल, सर्व राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक वितरण प्रणाली (Public Distribution System) आणि राष्ट्रीय सामाजिक सहाय्य (National Social Assistance) कार्यक्रम यांच्या माध्यमातून मृत व्यक्तींबाबतची माहिती व डाटा गोळा केली. १६ जुलैपर्यंत २०२५ पर्यंत २४ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधून अंदाजे १५.५ दशलक्ष मृत्यू रेकॉर्ड मिळाली. या आधार क्रमांकांची पुन्हा योग्य पडताळणी केल्यानंतर अंदाजे १.१७ कोटी आधार कार्ड नंबर निष्क्रिय करण्यात आले आहेत.

UIDAI (https://uidai.gov.in/en/) ने कुटुंबातील मृत व्यक्तींची माहिती देण्यासाठी My Aadhaar पोर्टलवर ‘Reporting of Death of a Family Member’ हे फिचर देखील सुरू केले आहे. त्यावर नातेवाईकांना मृत व्यक्तींची माहिती देता येते. UIDAI ने २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नागरी नोंदणी प्रणाली वापरून नोंदणीकृत मृत्यूंसाठी myAadhaar पोर्टलवर कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची तक्रार नोंदवणे ही सुविधा देखील सुरू केली. मृत व्यक्तीचा आधार क्रमांक निष्क्रिय केल्याने ओळख चोरी आणि फसवणूक यासारख्या समस्या दूर करणे शक्य झाले आहे.
सायबर गुन्हे रोखण्यासाठी फिचर…
My Aadhaar वर फक्त कार्ड नंबरच रद्द केले जात नाहीत, तर सुरक्षेसाठी टेक्निकल सुविधाही सुरु करण्यात आल्या आहेत. कार्डधारकांना बायोमॅट्रिक लॉक (Biometric lock) सुविधेच्या माध्यामातून आपली पर्सनल माहिती सुरक्षित ठेवता येते. त्यामुळे परवानगीशिवाय कोणीही बायोमेट्रिक फिंगरप्रिंटचा वापर कोणी करू शकत नाही. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या युगात, अशी फीचर्स नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.
Data Walt सुविधा…
केंद्र सरकारने व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्डचा उपयोग करणाऱ्या संस्थाना ‘डेटा वॉल्ट’चा (Data Walt) उपयोग करण्याचा निर्देश दिला आहे. यामुळे हे सुनिश्चित होते की, नागरिकांचे आधार नंबर जास्तीत जास्त सुरक्षेसाठी एन्क्रिप्टेडरित्या (Encrypted) संग्रहीत केले जातील. UIDAI ने नागरिकंच्या बायोमॅट्रिक डिटेल्स कधीही बाहेरच्या व्यक्ती किंवा संस्थांना ओपन करत नाही, असा दावा केला असून ऑफलाइन उपयोगासाठी क्यूआर कोड (QR code)चा उपयोग करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे कमी जोखीम घेऊन माहितीची पडताळणी सुनिश्चित होते.

आधार मोबाईल अॅपही सुरू…
सरकारने जनतेच्या सुविधेसाठी एक नवीन आधार मोबाईल अॅप (mAadhaar) लॉन्च केले आहे. या अॅपच्या माध्यमातून कुटुंबातील सदस्य त्यांच्या प्रियजनांच्या मृत्यूची सुचना सहज अधिकाऱ्यांना देऊ शकतात. आधार कार्र द्द करण्याची प्रोसेस तुमच्या घरबसल्या पडताळणी केलेले कागदपत्रे अपलोड करून पूर्ण करता येते. यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याचा त्रास कमी होतो.
मृत व्यक्तींची माहिती कशी नोंदवायची ?
या प्रक्रियेअंतर्गत सुरवातीला,
१) My Aadhaar (https://uidai.gov.in/en/) पोर्टलवर कुटुंबातील सदस्याला लॉग इन करावे लागते.
२) आधार नंबर आणि कॅप्चा टाकला की मोबाईलवर OTP येईल व लाॅगिन होईल.
३) त्यानंतर ‘Reporting of Death of a Family Member’हे फिचर सिलेक्ट करावे
४) मृत व्यक्तीचा आधार क्रमांक, मृत्यू नोंदणी क्रमांक आणि मूलभूत तपशील भरावा लागतो.
त्यानंतर आधार प्राधिकरण निष्क्रियतेवर कारवाई करण्यापूर्वी माहितीची पडताळणी करेल. UIDAI कडून देशभरातील आधार धारकांना मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची तक्रार My Aadhaar पोर्टलवर नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या नोंदीमुळे वेळेवर तक्रार केल्याने आधारकार्डचा होणारा गैरवापर टाळण्यास मदत होईल.

आधारचा स्टेटस् कसा तपासायचा ?
UIDAI तुमच्या आधार कार्डची सध्ये स्थिती जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फाॅलो करा…
१) फोन किंवा लॅपटॉपवरून MyAadhaar (https://uidai.gov.in) पोर्टल उघडा.
2) Check Aadhaar Validity वर क्लिक करा.
3) तुमचा Aadhaar CArd Number टाका व कॅप्चा कोड (Captha code) एंटर करा. यानंतर, Proceed पर्यायावर क्लिक करा.
4) तुमचा आधार स्टेटस दिसेल. तुमचा आधार स्टेटस, तुमची वयोमर्यादा, लिंग, राज्य आणि तुमच्या लिंक केलेल्या मोबाईल नंबरचा शेवटचा अंक दिसेल.