whatsapp
whatsapp

आता ‘मोबाईल नंबर लपवा, व्हॉट्सअप वापरा’

अलीकडच्या काळात अनेक प्लॅटफॉर्म्स हे सबस्क्रिप्शन मॉडेलवर चालतात, परंतु व्हॉट्सअप हे अशा मोजक्या प्लॅटफॉर्मपैकी एक आहे जे अनेक मोफत सुविधा देत असून आज ते आपल्या नियमित संवादाची गरज बनले आहे. मोफत असूनही, मेटा कंपनी दर महिन्याला या अॅपमध्ये नवनवीन फीचर्स जोडत असते. आणि प्रत्येक फिचर हे युजर्सची गरज ओळखून तयार केलेले असते.
अलीकडेच, कंपनीने या प्लॅटफॉर्मवर मेसेजेस गायब होण्यापासून ते चॅटलॉक आणि कंपॅनियन डिव्हाइस सपोर्टपर्यंतचे फीचर्स युजर्ससाठी उपलब्ध केले आहेत. या नवनवीन फीचर्समुळेच जगभरात व्हॉट्सअप आपली लोकप्रियता आणि विश्वासाहर्ता टिकवून आहे.
आता, हेच व्हॉट्सअप आता मोठे सुरक्षित फिचर आणत आहे. कि जे तुमच्या मेसेजिंग अॅप वापरण्याच्या पद्धतीत पूर्णपणे बदल आणि क्रांती घडवून आणू शकते. आणि हे फिचर म्हणजे व्हॉट्सअप ज्या मोबाईल नंबरच्या साहाय्याने वापरले जाते, तो नंबरच युजर्सना आता लपवता अथवा हाईड करता येणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हे फिचर खूपच महत्वाचे मानले जात आहे.

मग आता प्रश्न असा पडतो की, जर तुमचा फोन नंबरच दिसत नसेल तर तुम्ही एखाद्याशी संपर्क अथवा संवाद कसा साधणार ?. खरेतर मोबाइल नंबरचा वापर करून चॅट करणे, हे गेल्या अनेक वर्षांपासून व्हॉट्सअपचे एक ठळक वैशिष्ट्य राहिले आहे.

whatsapp

असो, आता या नवीन फिचरविषयी घेऊया…

मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअप एका गोपनीयता अपडेटवर सध्या काम करत आहे, कि ज्यामुळे युजर्सना व्हॉट्सअप वापरताना त्यांचे नाव देऊन मोबाइल नंबर लपवता येईल. खरेतर युजर्स बऱ्याच काळापासून अशा फिचरची वाट पाहत होते, मागणी करत होते. ही मागणी लक्षात घेऊन व्हॉट्सअप अखेर हे फिचर जोडत आहे, कि ज्यामुळे युजर्स त्यांचा मोबाइल नंबर शेअर न करताही मित्र, नातेवाईकांशी कनेक्ट होऊ शकतात.
कंपनी त्याच्या इंटरफेस आणि नियमांची ऍक्टिव्हपणे टेस्ट करत आहे. या फीचरचे सध्या टेस्टिंग सुरु असले तरी ते अद्याप युजर्ससाठी उपलब्ध केलेले नाही, पण कंपनी लवकरच हे अपडेट रोलआऊट करेल अशी अपेक्षा आहे.

हे फीचर व्हॉट्सअॅप वेबवर देखील असेल :
व्हॉट्सअॅप आता हे नाव फीचर वेब व्हर्जनवर आणत आहे. या अपडेटमुळे युजर्सना त्यांच्या आवडत्या नावाची उपलब्धता तपासता येईल आणि ते ‘प्री-बुक’ही करता येतील. लाँच होण्यापूर्वी युजर्सना त्यांचे नाव सुरक्षित करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे युजर्सचा अधिक सुरक्षित होतील.

प्रायव्हसी आणि पारदर्शकता आणण्याचा हेतू :
व्हॉट्सअॅपने हे नवीन फिचर आणून युजर्सला चांगली प्रायव्हसी देण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा युजर्स त्यांचे नाव ऍक्टिव्ह करतील, तेंव्हा निवडलेले नाव तुमच्या फोन नंबरऐवजी चॅटमध्ये दिसेल. आणि हे नावच तुमची ओळख अधिक सुरक्षित करेल. तुम्ही नाव बदलल्यानंतर सिस्टीम आपोआप एक नोटिफिकेशन पाठवेल. हे नोटिफिकेशन युजर्सना त्यांच्या सुरु असलेल्या सर्व चॅटमध्ये दिसेल.

आता पाहूया या फीचरची वैशिष्ट्ये काय आहेत…
हे नवीन फीचर युजर्सना त्यांच्या चॅटमध्ये त्यांचा फोन नंबर लपविण्याची परवानगी देईल. त्याऐवजी, ते एक युनिक युजरनेम किंवा हँडल सेट करू शकतील. तथापि, हे हँडल तयार करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.

  • नावामध्ये किमान एक अक्षर असणे आवश्यक आहे.
  • लहान अक्षरे (a–z), आकडे (0–9), एक डॉट (.) आणि एक अंडरस्कोर (_) वापरू शकता.
  • युजरनेम 3 ते 30 अक्षरांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • नावामध्ये .com सारख्या डोमेन वापरण्याची परवानगी नाही.
  • युजर्स त्यांचे नाव ‘डॉट’ने सुरू किंवा समाप्त होऊ शकत नाहीत आणि सलग दोन डॉट देखील वापरता येणार नाहीत.
  • तसेच पूर्वी निवडलेले नाव पुन्हा वापरता येणार नाही.
  • जर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आधीच हँडल अस्तित्वात असेल तर ते ब्लॉक देखील केले जाईल.
  • एकदा तुम्ही योग्य नावाची निवड केल्यानंतर, व्हॉट्सअॅप तुम्हाला एक कन्फर्मेशन स्क्रीन दाखवेल. हे तुमचे नवीन हँडल तुमच्या अकाउंटशी लिंक करेल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *