ऑनलाईन जगात दक्षता घ्या…सुरक्षित रहा !

मजबूत पासवर्ड वापरा: नेहमी मजबूत आणि किचकट पण स्वतःच्या लक्षात राहील असा पासवर्ड वापरावा. तसेच तो पासवर्ड नियमितपणे बदलत राहावा आणि असा पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नका.bank account hacked3

वन टाईम पासवर्ड (OTP) वापरा : ही सुरक्षिततेची एक अतिरिक्त स्टेप आहे. पासवर्डसह आणखी एक ऑथेंटिकेशन मेथड आहे, हा एक असा कोड असतो कि जो मोबाईलवर एसएमएस द्वारे सहा अंकी कोड मिळतो.

अँटीव्हायरस आणि अँटीमालवेअर सॉफ्टवेअर: कॉम्पुटर, लॅपटॉप तसेच मोबाईल डिव्हाइसवर अँटीव्हायरस आणि अँटीमालवेअर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे आणि ते नियमितपणे अपडेट करावे. त्यामुळे इंटरनेट तसेच विविध साईट्सवरून शिरकाव करणारे व्हायरस रोखता येतात.

सॉफ्टवेअर अपडेट्स: आपले ऑपरेटिंग सिस्टीम, ब्राउझर आणि इतर सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवा जेणेकरून ते नवनवीन सुरक्षा उपायांनी सिस्टीम सुसज्ज राहिल.

सार्वजनिक वाय-फाय सुरक्षित वापरा : सार्वजनिक वाय-फाय वापरताना काळजी घ्यावी. महत्त्वाची माहिती सार्वजनिक वाय-फायवर शेअर करणे टाळावे.

फिशिंगपासून संरक्षण : अनोळखी ईमेल, लिंक किंवा अटॅचमेंटवर क्लिक करणे टाळावे. नेहमी रिलायबल सोर्सेसकडूनच माहिती मिळवावी.

डेटा एन्क्रिप्शन : संवेदनशील डेटा एन्क्रिप्ट करा, त्यामुळे डेटा चोरीला गेला तरी तो वाचता येणार नाही.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *