सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी सातत्याने नवनवीन पद्धती शोधून काढत असून त्यामुळे तपास यंत्रणाही चक्रावून जात आहे. आताचा सर्वात लेटेस्ट फ्रॉड म्हणजे हॅकर्स नामांकित गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅपल या कंपन्यांच्या नावाचा वापर करून फसवणूक करत आहेत.
मुळात या कंपन्यांचेच फोन, सॉफ्टवेअर्स, वेबसाईट्स, मेल आणि अप्स बहुतांश यूजर्स वापरत असल्याने त्यांच्या नावाने आलेले मेल हे अधिकृत समजतो, आणि ते ओपन करून वाचतोही. पण याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार/हॅकर्स घेत आहेत.
याबाबतचा धोका लक्षात घेऊन अमेरिकेच्या सायबर सुरक्षा संस्थेने (Cyber security organization) जगभरातील गुगल, अॅपल आणि मायक्रोसॉफ्ट यूजर्सना अशा आलेल्या मेलपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

यूजर्सना त्यांचे ईमेल पासवर्ड सुरक्षित ठेवण्यास या संस्थेने सांगितले आहे. हे हॅकर्स यूजर्सना टार्गेट करण्यासाठी वेगाने नवीन पद्धती विकसित करत आहेत. अॅपल, गुगल किंवा मायक्रोसॉफ्टच्या नावाने येणारा कोणताही मेसेज किंवा कॉल यूजर्ससाठी धोका निर्माण करू शकतो. हल्लेखोर यूजर्सना फसवण्यासाठी तसेच त्यांची पर्सनल माहिती, जसे की साइन-इन क्रेडेन्शियल्स व सिक्युरिटी कोड मिळविण्यासाठी नवीन पद्धती अवलंबत आहेत. तयामुळे यूजर्सना, मेसेजेस आणि कॉल्सपासून सावध राहण्याची गरज आहे.
फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, एका रेडिटरने विचारले की कोणीतरी त्यांच्या फोनवर गुगल सिक्युरिटी प्रॉम्प्ट कसा पाठवू शकतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की कोणीही तुमच्या ईमेल अकाउंटसाठी, अकाउंट रिकव्हर प्रोसेस सुरू करू शकते. म्हणूनच जेव्हा तुम्हाला सिक्युरिटी प्रॉम्प्ट येतो होतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, जर तुम्ही ही प्रोसेस सुरू केली नसेल तर मेसेजकडे दुर्लक्ष करा.

या प्रकारच्या सायबर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी, यूजर्सनी दोन गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे: तुमच्या आजूबाजूला काय चालले आहे, याकडे लक्ष द्या. कोणतीही संशयास्पद हालचाल ताबडतोब ओळखा. जर तुम्हाला सेफ्टी कोड किंवा इतर माहिती विचारणारा संशयास्पद फोन कॉल आला तर ताबडतोब फोन बंद कट करा. हे लक्षात ठेवले पाहिजे कि, कंपन्या कधीही यूजर्सना थेट कॉल करून अशी माहिती विचारत नाहीत. त्यामुळे अशा मेल अथवा कॉलकडे दुर्लक्ष करा आणि ईमेल किंवा मजकूराद्वारे कधीही कोड शेअर करू नका.
सायबर सुरक्षा तज्ञांचे मते, हॅकर्स सतत नवीन पद्धती शोधत असतात. ते कधीही तुमची पर्सनल माहिती थेट विचारत नाहीत,

उलट ते तुम्हाला कोणत्या ना कोणत्या बहाण्याने जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून, कधीही अशा प्रयत्नांना बळी पडू नका. अशा प्रकारे, तुम्ही हॅकर्सपासून स्वतःचे रक्षण करू शकता. जर या हॅकर्सनी तुमची पर्सनल माहिती चोरली तर तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते, त्यामुळे सावध व्हा.